माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी निधन

0
3

विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तथा राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी (२२ मार्च) नागपूर येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दत्ता मेघे यांनी लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले होते.तसेच त्यांनी नागपूर आणि वर्धा परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. विशेषतः वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात त्यांचे योगदान अमूल्य आहे.

आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी विविध पक्षांमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असत.