सायबर गुन्ह्यांत 24% वाढ; 2025 मध्ये भारतीयांना 22,495 कोटींचा फटका

0
2

दि.१४(पीसीबी) – देशात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. 2025 मध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये तब्बल 24 टक्क्यांनी वाढ झाली असून भारतीयांनी सायबर फसवणुकीत 22 हजार 495 कोटी रुपये गमावले आहेत. ही माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

2024 मध्ये सायबर फसवणुकीत सुमारे 22 हजार 845 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. तर 2025 मध्ये आर्थिक नुकसान किंचित कमी झाले असले तरी गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2024 मध्ये 22.68 लाख प्रकरणे नोंदवली गेली होती, तर 2025 मध्ये ही संख्या 28.15 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, तक्रारी वाढल्या असल्या तरी एफआयआरची संख्या कमी झाली आहे. 2024 मध्ये 66 हजार 370 एफआयआर नोंदवले गेले होते, तर 2025 मध्ये ती संख्या 55 हजार 484 इतकी राहिली. बँका आणि पोलिसांकडून वेगाने हस्तक्षेप करून पैसे रोखण्याच्या प्रयत्नांमुळे अनेक प्रकरणे एफआयआरपर्यंत पोहोचण्याआधीच नियंत्रणात आणली गेली असल्याचे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

सायबर फसवणुकीत सर्वाधिक नुकसान इन्व्हेस्टमेंट स्कॅममुळे झाले आहे. 2025 मध्ये झालेल्या एकूण आर्थिक नुकसानीपैकी 76 टक्के रक्कम इन्व्हेस्टमेंट फसवणुकीमुळे गेली आहे. यात पोन्झी स्कीम, बनावट शेअर बाजार गुंतवणूक, क्रिप्टोकरन्सी स्कॅम यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे.

तसेच डिजिटल अरेस्ट स्कॅममुळे 9 टक्के तर सेक्सटॉर्शनमुळे 4 टक्के आर्थिक नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. प्रकरणांच्या संख्येनुसार पाहता 35 टक्के प्रकरणे इन्व्हेस्टमेंट फ्रॉड, 19 टक्के सेक्सटॉर्शन आणि 6 टक्के डिजिटल अरेस्ट यांच्याशी संबंधित आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, अत्याधुनिक तंत्रज्ञान, फिशिंग, रॅन्समवेअर, डिजिटल अरेस्ट आणि ओळख चोरी यांसारख्या पद्धतींचा वापर वाढल्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.

तज्ज्ञांच्या मते, जलद आणि जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांमुळे अनेक नागरिक या जाळ्यात अडकत असून लाखो रुपये गमावत आहेत. त्यामुळे अशा आकर्षक गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन