कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसाचा निकाह, खळबळ

0
2

दि.१३(पीसीबी)-२०२५ मध्ये कुंभमेळ्यादरम्यान मोनालिसा या मुलीची चर्चा झाली होती. तिचा रेखीव
आणि सुंदर चेहरा, निळे डोळे हे सौंदर्य देशभरात चर्चेचा विषय ठरलं होतं. मूळची मध्यप्रदेशची असणारी मोनालिसा भोसले ही मुलगी कुंभमेळ्यात रुद्राक्षाच्या माळा विकत होती. तिला चित्रपट मिळाल्यानंतरही ती चर्चेत आली होती. आता ती चर्चेत आहे फरमान खान या तिच्या प्रियकराशी लग्न केल्यामुळे. मोनालिसाच्या वडिलांनी हे लग्न म्हणजे फसवणूक असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे फरमानच्या वडिलांनीही तीव्र नाराजी दर्शवली आहे. मला हे लग्न मुळीच मान्य नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय फरमानच्या वडिलांनी?
फरमान केरळमध्येच असतो, बागपतला कधी कधी येतो. मोनालिसा नावाच्या मुलीशी त्याची मैत्री आहे, ते दोघं चित्रपटात काम करणार आहेत हे मला ठाऊक होतं. पण ते दोघं लग्न करणार आहेत हे मला माहीत नव्हतं. मला हे लग्न मुळीच मान्य नाही. मी फरमानवर नाराज आहे. कारण आमच्याकडे लग्न आमच्या धर्मात ठरवलं जातं. तो मोनालिसाला घेऊन घरी आला तरीही माझी नाराजी दूर होणार नाही. मी नाराज झालो आहे, नाराजच राहणार. मला बुधवारी रात्री ९ वाजता कळलं की फरमानने मोनालिसाशी लग्न केलं आहे. माझी झोपच उडाली. मला मुळीच झोप लागली नाही असं फरमानच्या वडिलांनी म्हटलं आहे.

मोनालिसा हिंदू आहे, आम्ही मुस्लिम जाट-फरमानचे वडील

या लग्नामुळे मी अजिबात आनंदी नाही. ती हिंदू आहे, आम्ही मुसलमान जाट आहोत, अशात आमच्या कुटुंबात अडचणी येतील. फरमान कधी कधीच इथे यायचा. १५ दिवसांपूर्वी त्याची आणि माझी चर्चा झाली होती. पण तो लग्न करणार आहे वगैरे त्याने काहीही सांगितलं नव्हतं. फरमानने लग्न करून चूक केली आहे. आम्हाला हे लग्न मान्य नाही. एकीकडे फरमान आणि मोनालिसा आमचं लग्न म्हणजे लव्ह जिहाद नाही असं सांगत आहेत. पण या दोघांनी घेतलेला निर्णय मोनालिसाच्या घरातल्यानाही मान्य नाही आणि फरमान खानच्या कुटुंबालाही मान्य नाही असंच दिसून येतं आहे. फरमानचा भाऊ म्हणाला, त्याने लग्न केलं आहे हे आम्हाला माध्यमांमुळे समजलं, फरमानने आम्हाला या लग्नाबाबत कल्पना दिली नाही. मोनालिसाला आम्ही ओळखतो कारण तिने चित्रपटात फरमानसह काम केलं आहे. मात्र फरमानने जे काही केलं ते योग्य नाही. आम्ही मुळीच खुश नाही.


मोनालिसा आणि फरमान या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावरही चर्चा होते आहे.
मोनालिसाच्या वडिलांचा आरोप काय?

माझ्या मुलीला फसवण्यात आलं आहे. मला वाटत नाही की हे खरोखरच लग्न आहे. माझी मुलगी मला सोडून कधी जायची नाही. पण तिला त्या लोकांनी (फरमानने) फुस लावली आणि माझ्यापासून तिला वेगळं केलं. माझी आणि माझ्या मुलीची फसवणूक करण्यात आली आहे, असं म्हणत मोनालिसा भोसलेचे वडील माध्यमांसमोर रडले. मला वाटलं की मुलीला चांगला चित्रपट मिळणार आहे. त्यासाठी मी तिच्याबरोबर केरळला गेलो होतो. मला त्यांनी तिथून पळवून लावलं आणि मी खूप रडलो. मी त्यांना सांगितलं मला दोन मिनिटं तिच्याशी बोलायलाही दिलं नाही. तिरुवनंतपुरमला मला घेऊन गेले होते. आम्ही दोघंही गेलो होतो. पण मला हे माहीत नव्हतं की मोनालिसाचं लग्न लावून दिलं जाणार आहे. मी पूर्ण रात्रभर झोपू शकलो नाही. मी खूप आशेने गेलो, मला वाटलं की तिला अभिनय शिकवला जाईल. चांगली स्टार होईल. मला हे माहीत नव्हतं की तिला फुस लावून काहीतरी खायला घालून त्यांच्या बाजूने करतील असं मोनालिसाच्या वडिलांनी म्हटलं आहे.