बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेठी उमेदवार

0
4

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेठी आज नामांकन दाखल करण्याची शक्यता आहे. असं घडलं तर बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार हे निश्चित मानलं जातं आहे. आत्तापर्यंत नितीश कुमार हे १० वेळा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नविन यांच्यासह जाऊन नितीश कुमार राज्यसभेसाठी त्यांचा अर्ज दाखल करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही उपस्थिती यावेळी असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

एनडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे राज्यसभेठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत ते राज्यसभेसाठी अर्ज दाखल करतील. नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडणार की नाही? याबाबत मात्र कुठलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान जर त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला तर मात्र बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार हे निश्चित मानलं जातं आहे.

विजय कुमार चौधरी यांनी असं सांगितलं की राज्यसभेसाठी अर्ज दाखल करायचा की नाही याचा अंतिम निर्णय नितीश कुमार घेतील. त्यांच्याशी चर्चा चालली आहे. नेमकं पुढे काय करायचं हे नितीश कुमारच ठरवतील. दरम्यान पक्षाला असं वाटतं आहे की नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार हे आता पक्षात सक्रिय व्हायला हवेत असंही विजय कुमार चौधरी म्हणाले. नितीश कुमार राज्यसभेवर जाणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर बिहार येथील मुख्यमंत्री निवासस्थानाच्या बाहेर बरीच गर्दी जमा झाली होती. जदयूचे कार्यकर्ते नितीश कुमार यांच्या सरकारी बंगल्याबाहेर जमा झाले होते. नितीश कुमार यांनी अर्ज दाखल केला तर बिहारमध्ये मुख्यमंत्री बदलणार हे निश्चित मानलं जातंय. तो मुख्यमंत्री भाजपाचा असेल का? याच्याही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.