धक्कादायक ! बंगळुरूत माजी इस्रो कर्मचाऱ्याने केली पत्नीची हत्या

1 Min Read

दि.१९(पीसीबी)-कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. दक्षिण बंगळुरूतील बोम्मनहल्ली परिसरातील द व्हर्चुओसो अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या इस्रोचे ६५ वर्षीय माजी कर्मचारी नागेश्वर राव यांनी आपल्या पत्नीची टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश्वर राव हे काही काळापासून नैराश्याच्या उपचाराखाली होते आणि मानसिक तणावाखाली होते. त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. मात्र त्या आधीच त्यांनी पत्नी संध्याश्री यांचा टॉवेलने गळा आवळून ठार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

घटना घडल्यानंतर आरोपी घरातून पळून न जाता एका परिचित व्यक्तीशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्या व्यक्तीने तातडीने पोलिसांना कळविले. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि राव यांना ताब्यात घेतले.व्हाईटफिल्ड विभागाचे पोलीस उपायुक्त सैदुलू अडावथ यांनी सांगितले की, आरोपी मानसिक तणावाखाली होता आणि आत्महत्येचा विचार करत होता. प्राथमिक तपासात या गुन्ह्यामागे इतर कोणतेही ठोस कारण आढळलेले नाही.दरम्यान, या दाम्पत्याची मुलगी अमेरिकेत राहत असून तिला घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनामागील नेमके कारण आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी अधिक चौकशी केली जात आहे.

Share This Article