पुण्यातील एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये बी.एड प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आता २४ फेब्रुवारी पर्यंत

0
3

दि. १२(पिसिबी):एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत कार्यरत असलेल्या एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे (पिन – 411038) येथे शैक्षणिक वर्ष 2026–2028 साठी बी.एड प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख आता वाढवून २४ फेब्रुवारी अखेरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थिनींना अर्जासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे, अशी माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

महाविद्यालयात बी.एड नियमित दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यासाठी 50 जागा उपलब्ध आहेत. तसेच बी.एड विशेष शिक्षण (Learning Disability) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रमही उपलब्ध असून त्यासाठी 30 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. हा अभ्यासक्रम आरसीआय (RCI) मान्यताप्राप्त आहे.

प्रवेशासाठी MAH-CET आणि ELCT परीक्षा अनिवार्य असून या परीक्षा 27 ते 29 मार्च 2026 दरम्यान होणार आहेत. मर्यादित जागा असल्याने पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांनी cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी संपर्क क्रमांक –
बी.एड नियमित: 9923917066 / 9422943736
बी.एड विशेष शिक्षण (LD): 9822848090 / 7767019639

तसेच प्रवेशासंदर्भातील शंका निरसनासाठी व्हॉट्सअॅप गटात सहभागी होण्यासाठी उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ही महत्त्वाची संधी असून प्रशासनाने तातडीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.