पिंपरी, दि. २५ – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर खिलारे (वय-६२) यांचे आज सकाळी ह्रयविकाराने झोपेतच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी डॉक्टर, दोन मुली असा परिवार आहे. मुली विदेशात असल्याने अंत्यसंस्कार उद्या सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेत ३५ वर्षे त्यांनी सेवा केली.














































