पिंपरी, दि. ३ ( पीसीबी )सुमारे १००० वर्षांपूर्वी सोमनाथ मंदिराच्या विध्वंसानंतर, ज्योतिर्लिंगाचे काही भाग पुन्हा प्रगट झाले आणि ते गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांना देण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि वैदिक धर्म संस्थान ने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये “मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग” च्या रुद्र पूजा आणि दर्शनाचे आयोजन केले आहे. रुद्रपुजा आणि दर्शनासाठी सर्वजण आमंत्रित आहेत.
प्रवेश सर्वांसाठी खुला आहे . 5 जुलै, शनिवार, संध्याकाळी 6.00 वाजता कासा डी सिल्व्हर, औंध – रावेत बीआरटीएस रोड, डांगे चौक जवळ, ताथवडे, पिंपरी-चिंचवड येथे सर्वांना दर्शनाचा लाभ घेता येईल असे संयोजकांनी कळविले आहे.
https://maps.app.goo.gl/W6bufdwMWjw5z8k47