राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

bpcauthor bpcauthor
2 Min Read

मुंबई, दि . १० ( पीसीबी ) : प्रशासनातील खांदेपालट सुरूच असून आताही राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वरिष्ठ आयएएस अधिकारी नितीन पाटील यांची राज्याच्या कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापक पदी बदली करण्यात आली आहे. तर आप्पासाहेब धुळाज यांच्याकडे राज्याच्या ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.

  1. नितीन पाटील (IAS:SCS:2007) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  2. ए.बी. धुळाज (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  3. लहू माळी (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  4. बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  5. मुरुगनंथम एम. (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  6. आदित्य जीवने (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  7. मिन्नू पी.एम. (IAS:RR:2021) सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  8. मानसी (IAS:RR:2021) सहाय्यक जिल्हाधिकारी, देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची महापालिका आयुक्त, लातूर महानगरपालिका, लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Share This Article