पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई करा – नाना काटे

1 Min Read

दि. १५ ( पीसीबी ) – दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेतर्फे शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई केली जाते परंतु, यावर्षी तसे केल्याचे दिसत नाही. सध्या अवकाळी पाऊस पडत आहे, व या अवकाळी पावसामुळे संपूर्ण शहरातील सर्व स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले यातील कचरा साफ न केल्याने स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन तुडुंब भरून जागो जागी रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असून नगरिकाना वाहने चालवताना, रस्त्याने चालताना अडचणीना सामोरे जावे लागत आहे, असे गाऱ्हाणे माजी विरोधीपक्ष नेते नाना काटे यांनी केले आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात ते म्हणतात, या साचलेल्या पाण्याने घणीचे साम्राज्य पसरत असून नगरिकाना आरोग्याच्या सम्मसेला देखील सामोरे जावे लागत आहे. ही खूप गंभीर बाब असून, आवकाळी पावसाने जर शहराचे हे हाल होत असतील तर नुकताच येवून ठेपलेल्या मोठ्या पावसात शहराची अवस्था जलमय होईल व संपूर्ण शहराला मोठया संकटाला सामोरे जावे लागेल,
पावसाळ्यापूर्वी शहरातील स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेज लाइन, नाले सफाई करण्याचे त्वरित आदेश संबंधित विभागाला देण्यात यावेत.

Share This Article