बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि . ९ ( पीसीबी ) – आतापर्यंत त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत बाबा वेंगा आणि त्यांनी 2025 साठी काय भविष्यवाणी केली होती.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव (India-Pakistan Tension) वाढत आहे. दोन्ही देश दररोज एकमेकांवर नवनवीन निर्बंध लादण्याची घोषणा करत आहेत. जगभरातील देश भारत आणि पाकिस्तानला शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. इतकेच नव्हे तर, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या विषयावर बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी दोन्ही देशांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या तणावामुळे युद्धाची शक्यता वाढत आहे. जगाबद्दल अनेक भविष्यवणी करणारे महान भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने काही असेच संकेत दिले आहेत. त्यांनी 2025 मध्ये पृथ्वीवर एका मोठ्या युद्धाची शक्यता वर्तवली होती. जरी बाबा वेंगा यांनी कोणत्याही विशिष्ट देशाचे नाव घेतले नव्हते, तरीही आतापर्यंत त्यांच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत बाबा वेंगा आणि त्यांनी 2025 साठी काय भविष्यवाणी केली होती.

काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी?
वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2025 मध्ये असा संघर्ष होईल ज्यामुळे युरोपचं मोठं नुकसान होईल. अनेक वर्षांपूर्वी केलेली त्यांची ही भविष्यवाणी आजही चर्चेत आहे. सध्या रशिया आणि युक्रेन तसेच गाझामध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. त्यातच आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याने जगात आणखी एक युद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेंगा यांनी 2025 मध्ये विनाशकारी भूकंपांचीही भविष्यवाणी केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप आला होता. त्यात 1700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Share This Article