दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

1 Min Read

आळंदी, दि. ६ –
आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने संस्थेत शिकत असलेल्या बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. ही घटना शनिवारी (दि. ४) मध्यरात्री घडली.

याप्रकरणी महेश नामदेव मिसाळ मामा (वय २८, रा. खोकरमोहा, ता. शिरूरकासार, जि. बीड) व त्याची बहीण अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित बारा वर्षीय मुलाच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी हद्दीतील वडगाव रस्त्याला ज्ञानेश्वरी गुरुकुल संस्था आहे. त्या संस्थेत आरोपी हा पाहुणा म्हणून आला होता. शनिवारी मध्यरात्री आरोपी हा पीडित मुलांच्या खोलीत येऊन त्यांच्या शेजारी झोपला. दरम्यान त्याने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. घटना उघडकीस आल्यानंतर आळंदी पोलिसांनी आरोपी महेश याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article