पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली, प्रशासन झोपलेले

1 Min Read

आळंदी, दि. २9 (पीसीबी)
आळंदी मध्ये पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे. अवघ्या महाराष्ट्राच श्रद्धास्थान असलेल्या माऊलींच्या आळंदीत इंद्रायणी मध्ये वारकरी पवित्र स्थान करत असतात. परंतु, नदी फेसाळल्यामुळे वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. वर्षभरात दहा वेळी नदी फेसळली पण महापालिका प्रशासन, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ, आळंदी पालिका या सर्व यंत्रणा कागदोपत्री नोटीस काढण्यापलिकडे काहीच करत नसल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

इंद्रायणी नदी ही वारंवार फेसाळते आहे. आज देखील इंद्रायणी नदीत पांढरे शुभ्र मोठ- मोठे बर्फासारखे तुकडे पाण्यावर तरंगत आहेत. गेल्या कित्येक महिन्यापासून आळंदीकर आणि वारकऱ्यांकडून इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याबाबत आवाहन केलं जात आहे. तसेच काही राजकीय पक्षांनी देखील इंद्रायणी नदी काठावर आंदोलन करून इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचा आश्वासन दिलं होतं. त्यानंतर प्रशासनामार्फत काही पावलं उचलण्यात आली. परंतु, आज पाहिलं तर नदीची अवस्था जैसे थे असल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार आणि आमदार यावर कुठलाही मुद्दा अधिवेशनात किंवा संसदेत दिसत उपस्थित करत नाहीत. केवळ हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आपली महत्वकांक्षा प्राप्त करायची असाच अजेंडा राजकीय नेत्यांचा दिसत आहे.

Share This Article