पीएमपी बस चालकाला मारहाण

1 Min Read

दोघांवर गुन्हा दाखल

महाळुंगे, दि. २७ (पीसीबी)
वाहतूक कोंडी असल्याने बस हळू चालवत असलेल्या पीएमपी बस चालकाला दोघांनी मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. २५) सायंकाळी पावणे आठ वाजता खेड तालुक्यातील बिरदवडी येथे घडली.

संकेत परमेश्वर कांबळे (वय २४, रा. खराबवाडी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी (एमएच १४/एलडब्ल्यू ७५५५) वरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पीएमपी बस चालक आहेत. ते भोसरी ते वासुली ही बस घेऊन भोसरी येथून वासुली येथे जात होते. बिरदवडी येथे वाहतूक कोंडी असल्याने कांबळे त्यांच्या ताब्यातील पीएमपी बस हळूहळू चालवत होते. त्यावेळी पाठीमागून एका दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी दुचाकी बसला आडवी लावली. त्यानंतर कांबळे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article