दि.21 (पीसीबी) – आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जगतगुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन वर्षा निमित्त आयोजित भव्य अखंड हरिनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण सोहळ्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका भंडारा डोंगर येथून पुणे येथील कोरेगाव हेलिपॅड वरून संगमनेर येथील बोटा येथे रविवारी ( दि.22) हेलिकॉप्टरने पुणे ते बोटा या दरम्यान विविध मंदिरांवर पुष्पवृष्टी करत नेण्यात येणार आहे. यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर आणि यजमान आदर्श सरपंच जालिंदर गागरे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी होणार आहे.
त्यासाठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या पवित्र पादुका श्री क्षेत्र बोटा येथे तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सुरु होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा परायण सोहळ्यामध्ये पादुका ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत हेलिकॉप्टरने हरिनाम गजरात नेण्यात येणार आहेत. श्रीक्षेत्र देहू येथून सकाळी ११ वा.श्रींचे वैभवी पादुका कोरेगाव पार्क येथील हेलिपॅडवर हरिनाम गजरात पोहोचणार आहेत.
तेथून दुपारी १ वाजताचे सुमारास पादुका हेलिकॉप्टर मधून बोटा येथे मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान हेलिकॉप्टर मधून श्रीक्षेत्र आळे येथील श्री रेडा समाधी मंदिरावर तसेच परिसरातील काही स्वयंभू मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. श्रींचे पादुकां समवेत श्री संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे आणि यजमान सरपंच जालिंदर गागरे या मान्यवर यांच्या हस्ते विविध ठिकाणी मंदिरांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यात पुणे आणि अहील्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुमारे 40 मंदिरांवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. विविध मंदिरांवर पुष्पवृष्टी केली जात आहे. यात श्री रेडा समाधी मंदिर आळे, आई कळमजाई माता मंदिर मोरदरा, मळगंगा माता मंदिर म्हसवंडी, रामदासबाबा मंदिर बेलापुर,भोजामाता मंदिर भोजदरी, खंडोबा मंदिर वनकुटे, हनुमान मंदिर कोठेखुर्द, हनुमान मंदिर जवळेबाळेश्वर,
कळमजाई माता महालवाडी, श्रीखंडोबा मंदिर सावरगाव घुले,
श्रीक्षेत्र बाळेश्वर शिखर मंदिर, शिवमंदिर पोखरी बाळेश्वर, कानिफनाथ मंदिर तळेवाडी, बिरोबा महाराज मंदिर साकुर, भगवती माता मंदिर नांदुर, विठ्ठल मंदिर येठेवाडी, खंद्रेश्वर मंदिर खंदरमाळवाडी, काळ भैरवनाथ डोळासणे, म्हसोबा मंदिर वरुडी, गोपाल कृष्ण सारोळे
काळभैरवनाथ माळेगाव, शनैश्वर मंदिर , आंबीखालसा, हनुमान मंदिर तांगडी, खंडोबा मंदिर कोठे बुद्रुक, सावताबाबा बोरबन,महादेव मंदिर घारगाव, बोलआईमंदिर कुरकुंडी, मुक्ताईमाता मंदिर बोटा, हनुमान श्रीकृष्ण आभाळवाडी,
भागाई माता मुंजेवाडी, श्री दत्तमंदिर अकलापुर, महालक्ष्मी मंदिर केळेवाडी, हनुमान मंदिर आळेखिंड, श्रीकृष्ण मंदिर माळवाडी, श्रीरोकडेश्वर मंदिर आंबीदु माला, श्रीराममंदिर कुरकुटवाडी, कचेश्वर मंदिर बोटा, हेलीपॅड अशा विविध मंदिरांवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. धार्मिक सोहळ्याचे पर्वणीत ही पुष्पवृष्टी होत आहे. बोटा येथे मोठा उत्सव अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळा सुरू होत आहे. त्या वैभवी सोहळ्याचे पूर्व संध्येला ही वैभवी पुष्पवृष्टी होत असल्याचे प्रशांत महाराज मोरे यांनी सांगितले.यासाठी जिल्हा व राज्य शासनाने देखील परवानगी दिली असून ही वैभवी पुष्पवृष्टी आणि श्रींचे पादुका बोटा येथे मंगलमय धार्मिक कार्यक्रम परंपरांचे पालन करीत होत आहे.या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्यात राज्यातील तसेच जागतिक आणि राष्ट्रीय कीर्तनकार यांची कीर्तन, प्रवचन सेवा रुजू होत आहे. या सोहळ्यातील ज्ञानदान, आणि अन्नदान महाप्रसाद वाटप सेवा परंपरेने होत आहे. भाविक, नागरिकांनी या पर्वणीचा तसेच श्रवणसुखाचा लाभ घेण्यासाठी सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.