घरातील साहित्य चोरी प्रकरणी शेजाऱ्यावर गुन्हा

1 Min Read

बावधन, दि. 1३ (पीसीबी) : शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शेजारच्या घरात चोरी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी पुंडलिक दगडे चाळ, बावधन येथे उघडकीस आली. वैभव मोहन वाघ (वय २३, रा. बावधन, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज रवींद्र कांबळे (रा. बावधन, पुणे. मूळ रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राज हा फिर्यादी वैभव यांच्या शेजारी राहतो. राज याने वैभव यांच्या घराचे कुलूप काढून आत प्रवेश केला. घरातून गॅस टाकी, शेगडी, सिलिंग फॅन, होम थिएटर, कपाट, हिटर, ग्रायंडर असे १३ हजार ८०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article