रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा

0
24

नवी दिल्ली,दि. 09 (पीसीबी): भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबरला संपत आहे. मल्होत्रा ११ डिसेंबरपासून गव्हर्नरपदाचा कार्यभार स्वीकारतील. सध्याच्या घडीला ते महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत. मल्होत्रा यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल. २०२२ मध्ये डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसनं सचिव संजय मल्होत्रा यांना आरबीआयच्या संचालकपदी नेमलं होतं.

संजय मल्होत्रा यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदावर नियुक्ती झालेली आहे. ते शक्तिकांत दास यांच्या जागी काम करतील. संजय मल्होत्रा आरबीआयचे २६ वे गव्हर्नर असतील. ते १९९० बॅचचे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये ते आरईसीचे चेअरमन आणि एमडी झाले. त्याआधी त्यांनी ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर काम केलं आहे. संजय मल्होत्रा यांनी त्यांचं अभियांत्रिकीचं शिक्षण आयआयटी कानपूरमधून पूर्ण केलं. प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पदव्युतर शिक्षण घेतलं. गेल्या ३० वर्षांत त्यांनी ऊर्जा, अर्थ, कर, माहिती-तंत्रज्ञान आणि खाण क्षेत्रात सेवा दिली आहे. सध्याच्या घडीला ते महसूल सचिव पदावर कार्यरत आहेत.