आळंदीत कार्तिकी एकादशी दिनी तीन लाख भाविकांचा जयघोष

0
3

श्रींचे पालखीची हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणा

मणिकर्णिका भागीरथी l इंद्रायणीचे स्नान करिती l
ते मोक्ष पदासी जाती येथे संशय नाही ll३ll

आळंदी, (दि. 26 (पीसीबी) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत उत्पत्ती एकादशी राज्य परिसरातून आदि. 26 (पीसीबी) :लेल्या सुमारे ३ लाख भाविकांनी हरिनाम गाजर करीत कार्तिकी एकादशी परंपरेने आळंदीत ग्राम प्रदक्षिणा, इंद्रायणी नदी स्नान, टाळ, मृदंग, विणीचा त्रिनाद करीत साजरी केली. आळंदी परिसरात एकादशी निमित्त आलेल्या भाविकांचे गर्दीने इंद्रायणी नदी घाट व परिसरातील रस्ते गर्दीने फुलले. आळंदी मंदिरात पहाट पूजे मंगलमय वातावरण धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाली. माउली मंदिर, इंद्रायणी नदी घाट येथे लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि मंदिरात आकाश विविध फुलांची पुष्प सजावट करण्यात आली होती. रांगोळीचे लक्षवेधी रेखाटनाचे भाविकांनी कौतुक केले. महाद्वारात पुष्पसजावटीने आलेले श्री विठ्ठल रुख्मिणी वैभवी मूर्ती भाविकांचे लक्षवेधी ठरले.

राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांचे आळंदीत हरिनामाचा जयघोषात झालेल्या गजरात भाविक न्हाऊन निघाले. आळंदीत सुरु असलेल्या विविध ठिकाणी तसेच मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करून दर्शन घेतले. ज्ञानोबा माउली तुकाराम असा हरिनाम गजरात प्रदक्षिणा मार्गावर भाविक चिंब झालेले दिसले. टाळ-मृदंगाचे नादाने अवघी अलंकापुरी नागरी दुमदुमून गेली. आळंदीत स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाने पहाट पूजे दरम्यान स्वच्छता सेवा रुजू केली. यासाठी अध्यक्ष सुनील तापकीर, महिला विंग प्रमुख आशा तापकीर यांचे सह सेवकांनी परिसर स्वच्छ करीत सेवा रुजू केली. दरम्यान घंटा नाद होताच मंगलमय सनई चौघडाचे वाद्य वादनात मंदिरात पहाट पूजा अंतर्गत ११ ब्रह्मवृंदांच्या वेद मंत्रोच्चारात पवमान अभिषेक झाला. मंदिरातील मंगलमय वातावरण, भक्तिमय उत्साह, सुरु असलेली आकर्षक फुलांची सजावट यामुळे परिसर सुगंधीत झाला. माऊलींच्या गाभाऱ्यात श्रींचे संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक पूजा झाली. यात दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावत पोशाखात केशरी मेखला, शाल, सोनेरी मुकुट ठेवताचा श्रींचे आकर्षक रूप सजले. यात लक्षवेधी आभूषणे, सोने,चांदीचे छत्र चामरे, विविध लक्षवेधी रंगातील पोशाख बांधीत तुळशीहार, चाफयाचे फुलांचा वैभवी हार अर्पण होताच श्रींचे वैभवी सजलेले रूप भाविकांनी आपले नेत्रात साठविले. श्रींची आरती होताच परंपरेने मानकरी आणि पदाधिकारी यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप झाले.
श्रींचे पहाट पूजेस खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, खेडचे प्रांत अनिल दौडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, सेवक चोपदार बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, योगेश आरु, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, राहुल चव्हाण, माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील, उपायुक्त दत्तात्रय लांघी, अजित वडगावकर, प्रशांत कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, भीमा घुंडरे, सचिन गिलबिले, सागर भोसले, साहेबराव कुऱ्हाडे, प्रदिप बवले, ज्ञानेश्‍वर रायकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, अभियंता सचिन गायकवाड, पुष्पाताई कुऱ्हाडे,प्राजक्ता घुंडरे, आळंदी मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी दिनी लाखो भाविकानी श्रींचे समाधीचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी मंदिर प्रदक्षिना करीत स्था माहात्म्य जोपासले, श्रींचे मंदिराचे कलश दर्शन घेत कार्तिकी वारीस हजेरी लावली. आळंदीत ग्राम प्रदक्षिणा करीत श्रींचे पालखीचे तसेच श्री संत नामदेवराय यांचे सह श्री पांडुरंगराय यांचे पालखीचे नदी लगत असलेल्या वासकर फड येथे जात श्रींचे पालखीचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी दर्शनास वैतागेश्वर महाराज यांचे मंदिरा मागील दर्शन बारीतुन जात दर्शन घेतले. सुमारे ३ लाख भर भाविकांची आळंदी कार्तिकी यात्रेस हजेरी असल्याचे जाणकार सांगतात. दर्शनबारीत भाविकांची मोठी गर्दी होती. मात्र यावर्षीची यात्रा कमी असल्याचे व्यापारी सांगतात.
श्रींचे नामजयघोषात राज्यातून आलेल्या दिंड्याची हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा केल्या. इंद्रायणी घाटावर स्नानास भाविकांची गर्दी केली होती. दरम्यान दिंड्यादिंड्यातून खांद्यावर पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मृदंगाचे वाद्य वादनात इंद्रायणी नदी घाटावर भाविक वारकरी, महिला यांचे सांप्रदायिक खेळ रंगले. यात फुगडी आदींचा समावेश होता. अनेक संतांचे पादुका पालखी मिरवणूक, नगरप्रदक्षिणा श्री विठ्ठल, माउली तुकाराम जयघोषात झाल्या. सर्वत्र शहरात ज्ञानोबा माऊलीचा, हरिनामाचा जयघोष सुरु असताना श्रींची पालखी तसेच श्री नामदेवरायांची पालखी देखील नगरप्रदक्षिणा मार्गावर हरिनाम गजरात आल्या. हजेरी मारुतीमंदिरात परंपरेने थांबून हरिनाम गजरात अभंग आरती होऊन श्रींची पालखी मंदिरात पुन्हा प्रवेशली.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने यावर्षी पहिल्यांदाच कार्तिकी वारी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास त्रिवेणी आश्रम ते श्री क्षेत्र आळंदी या मार्गावर श्री गुरुदेवांच्या पादुकांची पालखी सोहळा सुरू करीत सुमारे २५० पेक्षा जास्त साधकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, महाराष्ट्र, आर्ट ऑफ लिव्हिंग त्रिवेणी आश्रम, मरकळ यांनी या सोहळ्याचे आयोजन उत्साहात हरिनाम गजरात केले.
यावर्षी माऊलींचे पहाट पूजेस बसण्याचा मान दर्शनबारीतील प्रथम वारकरी दाम्पत्य अलका लोखंडे, अशोक लोखंडे यांना मिळाला. आळंदी देवस्थान ताफे अलका लोखंडे व अशोक लोखंडे यांचा सत्कार श्रींचे गाभा-यात श्रींची प्रतिमा, शाल, पुषार व श्रीफळ देऊन करण्यात आला. लोखंडे परिवार नाशिक जिल्ह्यातील यावर्षीचे पहिले दर्शनार्थी ठरले. यावेळी अशोक लोखंडे म्हणाले, नाथ महाराज यांचे कडे पंगत सेवा असते. श्रींचे कृपेने वारी होत आहे. त्यांनी असाच आशीर्वाद कायम द्यावा. कायम वारी आणि दर्शन घडावे. दोन वेळा पायी वारी झाली आहे. या प्रमाणे सर्व घरी सुरळीत आहे. मुलाला मुलगा व्हावा. म्हणजे आम्हाला नातू मिळेल. अशी भावना व्यक्त करीत या पुढील जीवन प्रवास असाच सुरळीत सुरु रहावा, श्रींचे गाभा-या प्रथम दर्शनार्थी मान मिळाल्याचा आनंद झाल्याचे सांगत हि वार्ता मुलाला तात्काळ त्यांनी कळवीत समाधान व्यक्त केले. शिंपी टाक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथून ते आळंदीत देवदर्शनास आले होते. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दर्शन बारीस उभे राहिले होते.अगस्ती महाराज यांची दिंडी प्रसाद सेवा रुजू होत असल्याचे सांगत निवृत्ती महाराज वारीत दिंडी ची सेवा रुजू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदीत कार्तिकी यंत्रे निमित्त मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा विविध भाविक, व्यक्ती , दानशूर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते देत असतात. आळंदीतील श्री गुरु आंबेकर आजरेकर फड येथे हरिनाम सप्ताह सुरु असून येथे दरवर्षी परंपरेने समाधी सोहळ्याचा उत्सव परंपरेने सुरु आहे. या साठी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले आहे. येथे भागवत महाराज चौरे यांचे मार्गदर्शनातं कीर्तन , प्रवचन, धार्मिक कार्यक्रम सोहळ्यात सुरु आहे. यामध्ये अन्नदान, फराळ पिट्टी ग्रुप केज आदींचे वतीने बीबीशेन ठोंबरे. सुनील तांबडे, शाहू आंधळे, देविदास तांबडे, दत्ता तांबडे, मुळे राजाभाऊ, कालिदास आंधळे, राम तांबडे, बाळू तांबडे आदींनी हजारो भाविताना अन्नदान सेवा रुजू झाली.
मणिकर्णिका भागीरथी l
इंद्रायणीचे स्नान करिती l
ते मोक्ष पदासी जाती येथे संशय नाही ll३ll
आळंदीत कार्तिकी एकादशी दिनी तीन लाख भाविकांचा जयघोष
श्रींचे पालखीची हरिनाम गजरात ग्राम प्रदक्षिणा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत उत्पत्ती एकादशी राज्य परिसरातून आलेल्या सुमारे ३ लाख भाविकांनी हरिनाम गाजर करीत कार्तिकी एकादशी परंपरेने आळंदीत ग्राम प्रदक्षिणा, इंद्रायणी नदी स्नान, टाळ, मृदंग, विणीचा त्रिनाद करीत साजरी केली. आळंदी परिसरात एकादशी निमित्त आलेल्या भाविकांचे गर्दीने इंद्रायणी नदी घाट व परिसरातील रस्ते गर्दीने फुलले. आळंदी मंदिरात पहाट पूजे मंगलमय वातावरण धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत झाली. माउली मंदिर, इंद्रायणी नदी घाट येथे लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि मंदिरात आकाश विविध फुलांची पुष्प सजावट करण्यात आली होती. रांगोळीचे लक्षवेधी रेखाटनाचे भाविकांनी कौतुक केले. महाद्वारात पुष्पसजावटीने आलेले श्री विठ्ठल रुख्मिणी वैभवी मूर्ती भाविकांचे लक्षवेधी ठरले.
राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांचे आळंदीत हरिनामाचा जयघोषात झालेल्या गजरात भाविक न्हाऊन निघाले. आळंदीत सुरु असलेल्या विविध ठिकाणी तसेच मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी करून दर्शन घेतले. ज्ञानोबा माउली तुकाराम असा हरिनाम गजरात प्रदक्षिणा मार्गावर भाविक चिंब झालेले दिसले. टाळ-मृदंगाचे नादाने अवघी अलंकापुरी नागरी दुमदुमून गेली. आळंदीत स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाने पहाट पूजे दरम्यान स्वच्छता सेवा रुजू केली. यासाठी अध्यक्ष सुनील तापकीर, महिला विंग प्रमुख आशा तापकीर यांचे सह सेवकांनी परिसर स्वच्छ करीत सेवा रुजू केली. दरम्यान घंटा नाद होताच मंगलमय सनई चौघडाचे वाद्य वादनात मंदिरात पहाट पूजा अंतर्गत ११ ब्रह्मवृंदांच्या वेद मंत्रोच्चारात पवमान अभिषेक झाला. मंदिरातील मंगलमय वातावरण, भक्तिमय उत्साह, सुरु असलेली आकर्षक फुलांची सजावट यामुळे परिसर सुगंधीत झाला. माऊलींच्या गाभाऱ्यात श्रींचे संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक पूजा झाली. यात दूध, दही, तूप, मध, साखर, आम्रखंड, सुगंधी तेल, उटणे, अत्तर लावत पोशाखात केशरी मेखला, शाल, सोनेरी मुकुट ठेवताचा श्रींचे आकर्षक रूप सजले. यात लक्षवेधी आभूषणे, सोने,चांदीचे छत्र चामरे, विविध लक्षवेधी रंगातील पोशाख बांधीत तुळशीहार, चाफयाचे फुलांचा वैभवी हार अर्पण होताच श्रींचे वैभवी सजलेले रूप भाविकांनी आपले नेत्रात साठविले. श्रींची आरती होताच परंपरेने मानकरी आणि पदाधिकारी यांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद वाटप झाले.
श्रींचे पहाट पूजेस खेड आळंदी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे, प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ.भावार्थ देखणे, खेडचे प्रांत अनिल दौडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, सेवक चोपदार बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, मानकरी योगीराज कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, योगेश आरु, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, राहुल चव्हाण, माजी विरोधी पक्ष गटनेते डी.डी.भोसले पाटील, उपायुक्त दत्तात्रय लांघी, अजित वडगावकर, प्रशांत कुऱ्हाडे, आदित्य घुंडरे, भीमा घुंडरे, सचिन गिलबिले, सागर भोसले, साहेबराव कुऱ्हाडे, प्रदिप बवले, ज्ञानेश्‍वर रायकर, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, अभियंता सचिन गायकवाड, पुष्पाताई कुऱ्हाडे,प्राजक्ता घुंडरे, आळंदी मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्तिकी एकादशी दिनी लाखो भाविकानी श्रींचे समाधीचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी मंदिर प्रदक्षिना करीत स्था माहात्म्य जोपासले, श्रींचे मंदिराचे कलश दर्शन घेत कार्तिकी वारीस हजेरी लावली. आळंदीत ग्राम प्रदक्षिणा करीत श्रींचे पालखीचे तसेच श्री संत नामदेवराय यांचे सह श्री पांडुरंगराय यांचे पालखीचे नदी लगत असलेल्या वासकर फड येथे जात श्रींचे पालखीचे दर्शन घेतले. अनेक भाविकांनी दर्शनास वैतागेश्वर महाराज यांचे मंदिरा मागील दर्शन बारीतुन जात दर्शन घेतले. सुमारे ३ लाख भर भाविकांची आळंदी कार्तिकी यात्रेस हजेरी असल्याचे जाणकार सांगतात. दर्शनबारीत भाविकांची मोठी गर्दी होती. मात्र यावर्षीची यात्रा कमी असल्याचे व्यापारी सांगतात.
श्रींचे नामजयघोषात राज्यातून आलेल्या दिंड्याची हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा केल्या. इंद्रायणी घाटावर स्नानास भाविकांची गर्दी केली होती. दरम्यान दिंड्यादिंड्यातून खांद्यावर पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मृदंगाचे वाद्य वादनात इंद्रायणी नदी घाटावर भाविक वारकरी, महिला यांचे सांप्रदायिक खेळ रंगले. यात फुगडी आदींचा समावेश होता. अनेक संतांचे पादुका पालखी मिरवणूक, नगरप्रदक्षिणा श्री विठ्ठल, माउली तुकाराम जयघोषात झाल्या. सर्वत्र शहरात ज्ञानोबा माऊलीचा, हरिनामाचा जयघोष सुरु असताना श्रींची पालखी तसेच श्री नामदेवरायांची पालखी देखील नगरप्रदक्षिणा मार्गावर हरिनाम गजरात आल्या. हजेरी मारुतीमंदिरात परंपरेने थांबून हरिनाम गजरात अभंग आरती होऊन श्रींची पालखी मंदिरात पुन्हा प्रवेशली.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या आशीर्वादाने यावर्षी पहिल्यांदाच कार्तिकी वारी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास त्रिवेणी आश्रम ते श्री क्षेत्र आळंदी या मार्गावर श्री गुरुदेवांच्या पादुकांची पालखी सोहळा सुरू करीत सुमारे २५० पेक्षा जास्त साधकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार, महाराष्ट्र, आर्ट ऑफ लिव्हिंग त्रिवेणी आश्रम, मरकळ यांनी या सोहळ्याचे आयोजन उत्साहात हरिनाम गजरात केले.
यावर्षी माऊलींचे पहाट पूजेस बसण्याचा मान दर्शनबारीतील प्रथम वारकरी दाम्पत्य अलका लोखंडे, अशोक लोखंडे यांना मिळाला. आळंदी देवस्थान ताफे अलका लोखंडे व अशोक लोखंडे यांचा सत्कार श्रींचे गाभा-यात श्रींची प्रतिमा, शाल, पुषार व श्रीफळ देऊन करण्यात आला. लोखंडे परिवार नाशिक जिल्ह्यातील यावर्षीचे पहिले दर्शनार्थी ठरले. यावेळी अशोक लोखंडे म्हणाले, नाथ महाराज यांचे कडे पंगत सेवा असते. श्रींचे कृपेने वारी होत आहे. त्यांनी असाच आशीर्वाद कायम द्यावा. कायम वारी आणि दर्शन घडावे. दोन वेळा पायी वारी झाली आहे. या प्रमाणे सर्व घरी सुरळीत आहे. मुलाला मुलगा व्हावा. म्हणजे आम्हाला नातू मिळेल. अशी भावना व्यक्त करीत या पुढील जीवन प्रवास असाच सुरळीत सुरु रहावा, श्रींचे गाभा-या प्रथम दर्शनार्थी मान मिळाल्याचा आनंद झाल्याचे सांगत हि वार्ता मुलाला तात्काळ त्यांनी कळवीत समाधान व्यक्त केले. शिंपी टाक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथून ते आळंदीत देवदर्शनास आले होते. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दर्शन बारीस उभे राहिले होते.अगस्ती महाराज यांची दिंडी प्रसाद सेवा रुजू होत असल्याचे सांगत निवृत्ती महाराज वारीत दिंडी ची सेवा रुजू होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदीत कार्तिकी यंत्रे निमित्त मोठ्या प्रमाणात अन्नदान सेवा विविध भाविक, व्यक्ती , दानशूर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते देत असतात. आळंदीतील श्री गुरु आंबेकर आजरेकर फड येथे हरिनाम सप्ताह सुरु असून येथे दरवर्षी परंपरेने समाधी सोहळ्याचा उत्सव परंपरेने सुरु आहे. या साठी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झाले आहे. येथे भागवत महाराज चौरे यांचे मार्गदर्शनातं कीर्तन , प्रवचन, धार्मिक कार्यक्रम सोहळ्यात सुरु आहे. यामध्ये अन्नदान, फराळ पिट्टी ग्रुप केज आदींचे वतीने बीबीशेन ठोंबरे. सुनील तांबडे, शाहू आंधळे, देविदास तांबडे, दत्ता तांबडे, मुळे राजाभाऊ, कालिदास आंधळे, राम तांबडे, बाळू तांबडे आदींनी हजारो भाविताना अन्नदान सेवा रुजू झाली