राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे छायाचित्र प्रदर्शन

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. ०२ (पीसीबी) : १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण तर्फे वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सायन्स पार्कचे संचालक श्री सारंग ओक यांचे वन्यजीव छायाचित्रांचे संकलन येथे प्रदर्शित करण्यात आले आहे. अनुभवी पक्षी निरीक्षक श्री उमेश वाघेला यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थी, प्रेक्षक तसेच शिक्षकांसह १०० नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते.

श्री नंदकुमार कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रास्ताविक केले. श्री सुनील पोटे, श्रीम. सोनल थोरवे व तांत्रिक विभाग यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा या वेळात तारांगण तळमजला येथे हे प्रदर्शन खुले असेल. नागरिकांनी जरूर या संधीचा लाभ घ्यावा. सदरच्या प्रदर्शनासाठी प्रेक्षकांना मोफत प्रवेश राहील.

प्रदर्शनाच्या पाठोपाठ सायन्स पार्क व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान व्याख्यानाचे ११६ वे पुष्प, “आपल्या सभोवतालचे पक्षी” या विषयावर श्री उमेश वाघेला यांचे माहितीपूर्ण व्याख्यान झाले.

Share This Article