राहत्‍या घरासमोरून बुलेट चोरीला

0
34

पिंपरी, दि. ०२ (पीसीबी) : राहत्‍या घरासमोर पार्क केलेली बुलेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 29) सकाळी उघडकीस आली.

हर्ष संजय भोसले (वय 19, रा. कॉसमॉस बँके शेजारी, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) यांनी सोमवारी (दि. 30) याबाबत आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना 27 ते 29 सप्‍टेंबर 2024 या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी भोसले यांनी त्‍यांची 70 हजार रुपये किंमतीची (एमएच 14/केपी 0065) ही बुलेट राहत्‍या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही बुलेट चोरून नेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.