अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दिघी, दि. 08 (पीसीबी) : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बोपखेल-दिघी मार्गावर घडली.

अमोल सत्यवान हुलावळे (वय 40, रा. फुगेवाडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गोपीचंद सत्यवान हुलावळे (वय 44, रा. फुगेवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अमोल हुलावळे हे त्यांच्या दुचाकीवरून बोपखेल दिघी मार्गे चऱ्होली येथे जात होते. ते एआयटी कॉलेज समोर आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये अमोल यांच्या डोक्याला, हाताला, छातीला तसेच शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article