सांगवीमध्‍ये सव्‍वातीन लाखांची घरफोडी

bpcauthor bpcauthor
1 Min Read
crime

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) सांगवी
दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी सहा वाजताच्‍या सुमारास अभिनवनगर, जुनी सांगवी येथे उघडकीस आली.

नारायण वसंत यलाटिकर (वय 33, रा. संकल्‍प हाऊस, अभिनव नगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी नारायण यलाटिकर यांचे घर शनिवारी दुपारी बारा ते रविवारी सकाळी सहा वाजताच्‍या दरम्‍यान कुलूप लावून बंद होते. त्‍यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्‍या घराच्‍या दरवाजाचे कुलूप तोडून आतील 53.21 ग्रॅम वजनाचे दोन लाख 80 हजार किमतीचे सोन्‍याचे दागिने, 20 हजार रुपये किमतीची चांदीचे दागिने, 10 हजार रुपयांचा लॅपटॉप व रोख 20 हजार रुपये असा एकूण तीन लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article