डॉक्टर सेल पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस स्वातंत्र्यदिनी बारा तास झेंडा फडकून करणार रेकॉर्ड !

0
48

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – १५ ऑगस्ट निमित्ताने हात से जुडे हात तिरंगा के साथ 🇮🇳अशा शीर्षकांतर्गत सकाळी आठ वाजल्या पासून संध्याकाळी सहा पर्यंत तिरंगा हाती फडकवण्याचा
निर्धार करायचा मानस डॉक्टर सेल पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस करीत असल्याची माहिती शहर डॉक्टरचे अध्यक्ष डॉक्टर मनिषा गरुड यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड म. न. पा. आयुक्त, पोलीस आयुक्त , शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती , सामाजिक संघटना , राजकीय संघटना पिंपरी चिंचवड डॉक्टर असोसिएशन , इंडियन डेंटल असोसिएशन आय. एम. ए. निमा व विमा होमिओपॅथी फिजोथेरपी असोसिएशन ,
सगळ्या धार्मिक जातीचे घटकाचे लोक कामगार , उद्योजक , बांधकाम व्यवसायिक , लायन्स क्लब , रोटरी क्लब , नागरिक बचत गट , सार्वजनिक माध्यमे , पत्रकार , सगळ्यांचा यात सहभाग करून घ्यायचा आहे‌

कार्यक्रम चालू असताना दिवसभर देशभक्तीपर गीत चालू राहणार आहेत , तसेच
या उपक्रमा मध्ये सहभागी होणाऱ्यांना प्रशस्तीपत्र व गुलाब कार्यक्रमातील सहभाग असलेले चित्र देण्यात येईल.
तरी ह्या विक्रमी कार्यक्रमात समस्त नागरिक कामगार उद्योजक विद्यार्थी व्यावसायिक डॉक्टर्स
पत्रकार मीडिया
सगळ्या स्तरातील लोकाना सहभाग नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे
सहभाग नोंदणी 9822059945