गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची एक कोटींची फसवणूक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि. ६ –
गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची तब्बल एक कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक 10 मार्च 2017 ते 30 जून 2024 या कालावधीत पिंपरी येथे घडली आहे.

याप्रकरणी चंद्रशेखर किसन शिंदे (वय 47 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यावरून मयत नरेंद्र रमेशचंद्र सेंगर व आकाश नरेंद्र सेंगर (दोघे रा. निगडी प्राधिकरण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नीला आरोपीने मिडीया आयडिया कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. यासाठी खोटी कागदपत्रे दाखवून फिर्यादी यांना कंपनीत 53 लाख 17 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यावेळी कोणताही परतावा न देता फिर्यादी यांची गुंतवणूकीची व परताव्याची मिळून 1 कोटी 43 लाख 17 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article