पुणे शहरात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि ५ जुलै (पीसीबी ) – पुणे शहरातील ससून रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन ससूनच्या परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तरावेळी दिली.

पुणे शहरातील ससून रुग्णालय दर्जेदार आरोग्य सेवा देणारे आहे. या रुग्णालयाच्या परिसरात कर्करोग रुग्णालय उभारणीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या रुग्णालयासमोर जागा आहे. ही जागा मिळण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन ससूनच्या परिसरात स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय उभारण्यात येईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तरावेळी दिली.

ससूनबाबत भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, यशोमती ठाकूर, अनिल देशमुख, विश्वजित कदम, रवींद्र धंगेकर, अशोक पवार, माधुरी मिसाळ यांनी भाग घेतला.

मुश्रीफ म्हणाले, ससून रुग्णालयात बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर उपलब्ध करून दिले आहेत. नवजात बालकांवरील उपचारांसाठी डॉक्टरांची संख्या पुरेशी असून उपचारासाठी अतिदक्षता विभागात खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. ससूनमधील सुविधा व सद्य:स्थितीबाबत शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही एमपीएससीमार्फत करण्यात येत आहे. गट ‘क’ मधील सर्व रिक्त पदे भरण्यात आली आहेत. गट ‘ड’ मधील रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी स्वरूपात स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये औषध खरेदीचे अधिकार अधिष्ठाता यांना दिले आहेत. त्यामुळे तातडीने औषधांची गरज असल्यास स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात येते. औषधे नसल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने तक्रार करावी. ससूनमध्ये मागील काळात घडलेल्या गुन्ह्यांबाबत आरोपींवर कडक कारवाई केली आहे. या रुग्णालयात डायेलिसीसची व्यवस्था करण्याबाबत पडताळणी करण्यात येईल. यकृत बदल उपचाराची व्यवस्था मुंबईत असून पुण्यात शासकीय रुग्णालयात ही सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Share This Article