दि ९ मे (पीसीबी ) – व्यावसायिकाला रस्त्यात अडवून चौघांनी दगडाने मारहाण करत जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि.8) पिंपरी येथे घडली आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात मायकल डॉमनी फर्नांडीस (वय32 रा. कासारवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून जमीर , गुंड्या, आलम शेख, अझर (सर्व रा. कासारवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला रस्त्यात आवाज देवून आडवले. तसेच त्यांना आज कल तू बहोत पैसे कामाने लगा है म्हणत दगडाने डोक्यात व हातावर मारून गंभीर जखमी केले. या झटापटीत फिर्यादी यांची 8.5 ग्रॅमची सोन्याची साखळी गहाळ झाली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.












































