भूखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना अटक

0
691

परभणी, दि. १५ (पीसीबी) – कर्मचारी गृहनिर्माण संस्थेचा भूखंड लाटल्याप्रकरणी माजी खासदार गणेश दुधगावकर यांना परभणीतील नानलपेठ पोलिसांनी आज (सोमवार) अटक केली आहे.  

ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण सोसायटीच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी गणेश दुधगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात तीन दिवसांपूर्वी एका तलाठीला देखील अटक करण्यात आली होती.

दुधगावकर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. गणेश दुधगावकर हे काँग्रेसमधून शिवसेनेत गेले. शिवसेनेच्या तिकिटावर ते खासदारही झाले. मात्र, चार वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.