शिंदे-ठाकरेंची शिवसेना १३ मतदार संघात आमने सामने

0
105

लोकसभा निवडणुकीत राज्यात तीन टप्पे पूर्ण झाले. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मोठी चुरस आहे. सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतींकडे लागले आहे. राष्ट्रवादीमधील लढतीत शरद पवार यांचा गट बाजी मारणार की अजित पवार यांचा गट आणि दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना खरी की एकनाथ शिंदेंची त्याचा फैसला होणार आहे. ४ जूनला निकाल हाती येईल त्यावेळीच काय ते स्पष्ट होईल.

बारामती आणि शिरूर मध्ये दोन राष्ट्रवादीत –

राष्ट्रवादीमधील दोन गट केवळ बारामती आणि शिरूर या दोन लोकसभा मतदार संघात समोरासमोर आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना तब्बल १३ मतदार संघात समोरासमोर आहे. त्यामुळे जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कोणाची यावर निकालानंतर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच मुंबई शहरातील तीन मतदार संघातही दोन्ही गट समोर असल्यामुळे मुंबईत वर्चस्व कोणाचे आहे, ते समजणार आहे. शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकाही मतदार संघात आमने सामने नाहीत, हे आणखी विशेष आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना १३ लोकसभा मतदार संघात आहे. त्यात मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम हे मुंबईतील तीन मतदार संघ आहे. यामुळे मुंबई कोणाची याचा निर्णय या लोकसभेत लागणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मतदार संघात आणि कल्याणमध्ये दोन्ही सेना समोरासमोर आहे. हातकणंगले, मावळ, नाशिक, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली या मतदार संघात ठाकरे सेना आणि शिंदे सेना समोरा समोर आहे.

भाजप विरुध्द ठाकरेंची शिवसेना –
१) पालघर – हेमंत विष्णू सावरा (भाजप) – भारती कामडी (शिवसेना ठाकरे)
२) मुंबई इशान्य – मिहीर कोटेचा (भाजप) – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे)
३) सांगली – संजयकाका पाटील (भाजप) – चंद्रहार पाटील (शिवसेना ठाकरे)
४) रत्नागिरी- सिंधुदूर्ग – नारायण राणे (भाजप) – विनायक राऊत (शिवसेना ठाकरे)

भाजप विरुध्द राष्ट्रवादी शरदचंद्र पवार –
१) रावेर – रक्षा खडसे (भाजप) – श्रीराम पाटील (राष्ट्रवादी शरद पवार)
२) वर्धा – रामदास तडस (भाजप)- अमर काळे (राष्ट्रवादी शरद पवार)
३) दिंडोरी – भारती पवार (भाजप) – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार)
४) भिवंडी – कपिल पाटील (भाजप) – सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (राष्ट्रवादी शरद पवार)
५) अहमदनगर – सुजय विखे पाटील (भाजप)– निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार)
६) बिड – पंकजा मुंडे (भाजप) – बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार)
७) माढा – रणजित निंबाळकर (भाजप) – धैर्यशिल मोहिते (राष्ट्रवादी शरद पवार)
८) सातारा – उदयन राजे (भाजप) – शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शरद पवार)

राष्ट्रवादी अजितदादा विरुध्द राष्ट्रवादी शरद पवार –
१) बारामती – सुनेत्रा पवार (अजित राष्ट्रवादी) – सुप्रिया सुळे (शरद पवार)
२) शिरूर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार) – शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी)

शिंदे शिवसेना – काँग्रेस
१) रामटेक – राजू पालवे (शिंदे शिवसेना) – शामकुमार बर्वे (काग्रेस)
२) कोल्हापूर – संजय मंडलिक (शिंदे शिवसेना) – शाहू छत्रपती महाराज (काँग्रेस)

एकाही ठिकाणी यांच्यात सामना नाही –
विशेष म्हणजे अजित पवार गट आणि काँग्रेस तसेच शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकाही मतदार संघात समोरासमोर नाहीत.