फडणवीसांची गांडू शिवसेना गप्प आहे…

0
104

दि ६ मे (पीसीबी ) – मुंबईत गुजरातच्या एका कंपनीने मराठी माणसाला नोकरी नाकारल्याचा मुद्दा सध्या गाजत आहे. त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली. “हे खरं आहे. मुंबईत गुजरात स्थित एका कंपनीने मराठी लोकांनी अर्ज करु नये अशी भूमिका घेतली. त्यावर महाराष्ट्राच सरकार, मुख्यमंत्री जे म्हणतात आमची शिवसेना खरी, जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली. मराठी माणसाचा आवाज राहू नये, याच कारणासाठी मोदी-शाहंनी ही शिवसेना तोडली” असं संजय राऊत म्हणाले.

“शिवसेना शिंदेगट ही बुळचट शिवसेना आहे. ही फडणवीसांची गांडू शिवसेना गप्प आहे. हिम्मत असेल आवाज द्या, आम्ही बघतो काय करायचं ते. काल बहुसंख्य गुजराती राहत असलेल्या घाटकोपरच्या एका सोसायटीत शिवसैनिकांना मराठी आहेत म्हणून येण्यापासून रोखलं, ही फडणवीसांची गांडू बुळचट शिवसेना काय करतेय? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने हे आव्हान स्वीकारलय” असं संजय राऊत म्हणाले.

काल राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आरएसएस समर्थक अधिकाऱ्याने हेमंत करकरेंना गोळी घातली असा आरोप केला. त्यावर सुद्धा संजय राऊत बोलले. “हेमंत करकरे हे शहीद झाले. ते देशासाठी लढले. ते एटीएसचे प्रमुख होते. RSS आणि करेकरेंमध्ये भांडण होतं. म्हणून अशा गोष्टी समोर येतात. हे माझं व्यक्तीगत मत आहे” असं संजय राऊत म्हणाले.

“एटीएसने दोघांना पकडलेलं. साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहीत, ते दोघे आरएसएसशी संबंधित होते. माझ्याकडे आरएसएसचे लोक यायचे. करकरेंनी चुकीची कारवाई केली म्हणून सांगायचे. कर्नल पुरोहितांच कुटुंब यायचं. करकरेंनी चुकीची कारवाई केली असं त्याचं म्हणणं होतं, त्यातून ही थिअरी समोर आली. विजय वडेट्टीवारांच नाव का घेता? who kill karkare हे पुस्तक कोणी लिहिलय? हसन मुश्रीफ भाजपासोबत आहेत, त्यांच्या भावाने हे पुस्तक लिहिलय, तेव्हा ते आयजी होते. हा प्रश्न भाजपाला विचारा” असं संजय राऊत म्हणाले.