चुकून घराच्या पत्र्यावर लागलेल्या दगडामुळे तरुणाला बेदम मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

देहुरोड, दि. १३ (पीसीबी) :- कुत्र्यासाठी मारलेला दगड चुकून घराच्या पत्र्यावर लागला म्हणून तरुणाला दोघांनी लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.11) देहुरोड येथील एम.बी.कॅम्प येथे घडली आहे.

याप्रकरणी कन्हैय्या संपत नायडू (वय 23 रा.देहुरोड) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून सोना वेल्लू स्वामी व अजय बाला कुपूस्वामी दोघे रा. देहुरोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्वच्छतागृहाकडे जात असताना एक कुत्रे त्यांच्या अंगावर धावून आले. यावेळी फिर्यादी यांनी बचावासाठी त्याला दगड मारला. मात्र तो दगड चुकून आरोपीच्या घराच्या पत्र्यावर जाऊन लागला. यावेळी आरोपींनी तू मुद्दाम घरावर दगड मारलास म्हणत फिर्यादीला लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. यावरून देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article