ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

bpcauthor bpcauthor
1 Min Read

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला ट्रॅव्हल्सची धड बसली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (दि.24) भोसरी येथील लांडेवाडी झोपडपट्टी जवळ घडला.

अर्जून रामभाऊ गव्हाणे (वय 39 रा. लांडेवाडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून ट्रॅव्हल्स चालक तुकाराम लिंबाजी यमगर (वय 31 रा. परळी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा 43 वर्षीय भऊ हे रस्ता ओलांडत असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स चालवून फिर्यादी यांच्या भावाला धडक दिली. यावेळी गंभीर जखमी झालेले फिर्यादीचे भाऊ यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला मदत न करता आरोपी तेतून पळून गेला. एमआडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article