दिघी – आळंदी रोडवर तरुणाला तृतीय पंथीयांकडून मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला तीन तृतीय पंथ्यांनी मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.30) दिघी- आळांदी रोड वर एमआयटी महाविद्यालयाच्या जवळ ही घटना घडली.

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात बालाजी गुरुनाथ स्वामी (वय 26 रा.दिघी) यांनी गुरुवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. यावरून तीन अनोळखी तृतीय पंथ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे दोन मित्र हे कळस गावाकडे जात असताना ते रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबले असता आरोपी तृतीयपंथी तेथे आले व त्यांनी फिर्यादीच्या मि६ला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांना दोघांनी पकडले व त्यातील एकाने चाकुने फिर्यादीच्या डोक्यावर व मानेवर वार करत गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीच्या दुचाकीचे नुकसान केले. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article