बनावट दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त

0
246

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पुण्यातील जुना मुंबई पुणे हायवेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोव्याहून आणलेल्या बनावट दारूच्या 60 हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. 600 बॉक्समध्ये आलेल्या बनावट मद्याची किंमत 21 लाख रुपयेचा साठा जप्त करण्यात आल्या आहे . जुन्या मुंबई पुणे मार्गावर असलेल्या मामुर्डी गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी एक ट्रक जुना मुंबई पुणे हायवे रोडवर, मामुरडी गावाजवळ येथून जाणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार, सापळा रचून अधिकारी कर्मचाऱ्यांनी तो ट्रक (DD-01-2-9205) अडवला आणि त्याची तपासणी केली. या ट्रक मध्ये गोवा राज्यात निर्मित बनावट देशी दारू असल्याचं समोर आले. पोलिसांनी संत्रा 90 मि.ली. क्षमतेच्या 60,000 बाटल्या (600 बॉक्स) एव्हढा मुद्देमाल मिळून आला. या मुद्देमालाची किंमत तब्बल 21 लाख रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात 15 लाखाच्या वाहनासह एकूण 36 लाख रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

गोव्यात जाऊन धडक कारवाई, 38 लाखांचा मुद्देमाल जप्त
जप्त बनावट देशी मद्य हे गोवा राज्यातील वडावल या ठिकाणी एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये तयार केले जात आहे. गोव्यात तयार होणारं बनावट मद्याची विक्री महाराष्ट्र राज्यात केली जात होती असल्याचं तपासात समोर आले आहे. बनावट मद्याबाबतची माहिती समजल्याने या पथकामार्फत गोवा राज्यात जाऊन बनावट देशीमद्य निर्मितीच्या कारखान्यावर छापा घालून बनावट देशी मद्य तयार करण्यासाठी लागणारा 1 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल सीलबंद करण्यात आला आहे. झुल्फिकार ताज आली चौधरी व अमित ठाकूर आहेर या दोघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत 38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

सदर कामगिरी डॉ. विजय सुर्यवंशी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, म. रा. मुंबई, सुनिल चव्हाण, संचालक, दक्षता व अमंलबजावणी, राज्य उत्पादन शुल्क, म. रा. मुंबई यांचे आदेशानुसार व सागर धोमकर, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, पुणे, चरणसिंग राजपुत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे. युवराज, उप-अधीक्षक, पिंपरी-चिंचवड, राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आधारे निरीक्षक, दीपक बा. सुपे, निरीक्षक, रा.उ.शु.एफ विभाग, पुणे, प्रविण शेलार, निरीक्षक, रा.उ.शु, सासवड विभाग, पुणे, रोहित माने, आर. एम. सुपेकर, डी. वाय. गोलेकर, श्रीमती. शीतल पवार, श्रीमती. नम्रता वाघ, सर्व दुय्यम निरीक्षक,डी. के. पाटील, सागर धुर्वे, सहाय्यक दुय्यम- निरीक्षक, तसेच सर्वश्री जवान, रोहिदास गायकवाड, अतुल बारंगुळे, तात्याबा शिंदे, राहूल जौंजाळ, अशोक आदमनकर, राम चावरे, संजय गोरे आदींनी सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास दिपक बा. सुपे, निरीक्षक, रा.उ.शु एफ विभाग, पिंपरी, पुणे हे करीत आहेत.