प्रभू रामचंद्र आमचे श्वास, त्यांच्याविना जीवन शून्यदादा वेदक यांचे प्रतिपादन

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी दि .२१ (पीसीबी)- आदर्श राजा, आदर्श पुरुष प्रभू रामचंद्र आमचे श्वास आहेत त्यांच्या विना जीवन शून्य आहे. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय केंद्रीय सहमंत्री तथा सत्संग सहप्रमुख महेंद्र (दादा) वेदक यांनी येथे केले.
श्रीक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतलेल्या कार सेवकांचा सत्कार दादा वेदक यांच्या हस्ते कासरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. वेळे ते बोलत होते यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, प्रकाश मीठ भाकरे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके ,स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडेगिरी ,भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभा लोखंडे , ज्येष्ठ नेते नंदू कदम आदी उपस्थित होते.
यावेळी दादा वेदक म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर होत असल्याचा हिंदूंबरोबरच 70 टक्के मुस्लिमांनाही आनंद आहे.डॉ. गिरीश आफळे व डॉ. प्रतिभा लोखंडे यांनी कारसेवेतील अनुभव कथन केले. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नंदू कदम यांनी सूत्रसंचालन केले.

Share This Article