अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

bpcauthor bpcauthor
1 Min Read

वाल्हेकरवाडी, दि. २७ (पीसीबी): भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.

शरद अच्युतराव घोडके असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी घोडके यांच्या पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती शरद घोडके हे वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन रोडने दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये शरद घोडके हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच माहिती न देता पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article