पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

कुरुळी, दि. २६ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. 25) दुपारी दीड वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे करण्यात आली.

आकाश विजय कुरवरे (वय 25, रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राजकुमार हणमंते यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी गावात एकजण पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन आकाश कुरवरे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख रुपये किमतीच्या दोन पिस्टल आढळून आल्या. पोलिसांनी पिस्टल जप्त करत आकाश विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article