कार एजंट कडून तरुणाची फसवणूक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) -ग्राहकाला कार दाखवतो असे सांगून कार नेत एका तरुणाची पाच लाखांची फसवणूक केली. ही घटना 5 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर मोशी येथे घडली.

दर्शन राजेभाऊ वाघमारे (वय 20, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी 23 नोव्हेंबर रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत सुभाष कांबळे (वय 36, रा. शिवणे, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कार एजंट असल्याचे त्याने फिर्यादीस सांगितले. फिर्यादी वाघमारे यांची कार (एमएच 04/जेएम 2191) विकायची असल्याने त्यांची कार ग्राहकाला दाखवण्याच्या बहाण्याने चंद्रकांत कांबळे याने नेली. ती पाच लाख रुपये किमतीची कार वाघमारे यांना परत न देता कारचा अपहार करत वाघमारे यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article