“६५ वर्ष्याच्या वृद्ध महिलेने जिंकले ‘मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३’ विजेतेपद”

bpcauthor bpcauthor
2 Min Read

‘मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३’ उत्साहात संपन्न

पुणे, दि. २७ (पीसीबी) – महिला साक्षमीकरणसाठी साठी आयोजित “मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३” या स्पर्धेचा ग्रँड फिनॅले पुणे येथील दि ऑर्किड हॉटेल येथे पार पडला. या स्पर्धेमध्ये ५ महिला संचालिका पदावर आहेत. स्पर्धेच्या संस्थापक – संचालक डॉ. भारती पाटील, इंटरनॅशनल ग्रुमर पायल प्रामाणिक, पेजंट ऍडवायझर डॉ. संगीता गायकवाड, नॅशनल पेजंट को-ऑर्डिनेटर नेहा रोकडे, ब्रॅण्डिंग पार्टनर नूतन जाधव या आहेत.

स्पर्धेत 12 – 13 वर्षांच्या मुलींपासून 65 वर्षांच्या आजीबाईनी सहभाग घेत जो कॉन्फिडन्स दाखवला त्याला तोड नाही, स्पर्धक मुली, महिलांचे कौतुक करावे तितके कमी आहे. या स्पर्धेमध्ये अमृता खानविलकर यांची खास उपस्तिती होती.

६५ वर्ष्यांच्या डॉक्टर शुभांगी परब या मुख्य आकर्षण ठरल्या. डॉ. शुभांगी यांनी ४ दिवसीय सौंदर्य स्पर्धेच्या ‘मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३’ विजेतेपद जिंकून एक आदर्श दाखून दिला.

महिला सक्षमीकरणासाठी डॉ. भारती पाटील प्रस्तुत “मिस अँड मिसेस इंडिया एमपॉवर्स २०२३” दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांच्या द्वारे समर्पित हि स्पर्धा नॅशनल पेजंटचे सर्व नियम पाळून चार दिवसांसाठी आयोजित करण्याल आली होती. या स्पर्धेचे अनेक वैशिष्ट्य आहे. त्यापैकी काही वैशिष्ट्ये म्हणजे या सौंदर्य स्पर्धेने महिला सक्षमीकरणावर भर दिला. या स्पर्धेच्या मंचावर महत्त्वाच्या भूमिका साकारणार-या व्यक्ती या मोठ्या प्रमाणात महिलाच होत्या. डायरेक्टर पॅनेलवर सर्व महिलाच होत्या. ही स्पर्धा चार दिवसांची होती. यामध्ये ग्रुमिंग सेशन, टॅलेंट राऊंड, ब्रायडल, गोल्डन सिक्वेंस राऊंड घेण्यात आले. या स्पर्धेचे एकूण ४ टायटल होते, ‘टिन, मिस- मिसेस आणि एम एस.’ स्पर्धेच्या ऑडिशनच्या वेळी ‘गिनिस बुक’च्या टीमला विशेष निमंत्रण होतं आणि फिनॅलेमध्ये देखील त्यांनी त्यांची विशेष उपस्थिती दर्शवून संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे कौतुक केले.

Share This Article