दारूच्या नशेत तिने मारली थेट पोलिसांच्या कानशिलात…! व्हिडिओ व्हायरल

0
701

गुजरात, दि.२८ (पीसीबी) – सध्या गुरजारतमधील एका महिलेचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती पोलिसांशी गैरवर्तन करताना दिसत आहे. गुजरातमध्ये अनेक वर्षांपासून दारूबंदी लागू आहे, मात्र तरीही अनेक लोक दारुच्या नशेत आढळतात. अशातच आता एका महिलेने दारूच्या नशेत पोलिसांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक गुजरातमधील दारू बंदीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

हि महिला दारूच्या नशेत गाडी चालवत होती म्हणून पोलिसांनी तिला थांबवलं, मात्र तिला पोलिसांनी थांबवल्याचा राग आला आणि ती पोलिसांचे व्हिडिओ शूट करु लागली. यावेळी पोलिसांनी तिचा मोबाईल घेतल्यामुळे ती संतप्त झाली आणि गाडीतून उतरुन पोलिसांशी वाद घालू लागली. बराच वेळ तिचा गोंधळ वडोदराच्या रस्त्यावर सुरू होता, ज्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमधील महिला पोलिसांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. यावेळी एक महिला पोलिसाने तिला शांत करण्याचा प्रयत्न करायला जाताच ती पोलिसांवर हात उचलण्याचा प्रयत्न करते. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला एक प्रसिद्ध कलाकार सून तिने दारूच्या नशेत बराच वेळ रस्त्यावर गोंधळ घातला होता.

दरम्यान महिलेचा दारुच्या नशेतील व्हायरल व्हिडिओवर अनेक लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिते आहेत.