मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे; एफआयआर दाखल

0
289

देश,दि.२९(पीसीबी) – मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न परेड केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने एफआयआर नोंदवला आहे. सीबीआय अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. १९ जुलै रोजी महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली.

मणिपूर घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठे यश मिळाले आहे. त्यांच्याकडून तो मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ज्याचा उपयोग दोन महिलांच्या नग्न अवस्थेत धिंड काढल्याचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी केला जात होता. हे प्रकरण सीबीआयकडे आहे.

सीबीआयने गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार मणिपूर पोलिसांकडून तपास हाती घेत नवीन एफआयआर नोंदवला आहे. या एफआयआरमध्ये कलम १५३ए, ३९८, ४२७, ४३६, ४४८, ३०२, ३५४ आणि ३६४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेलेची धिंड काढण्याची ही घटना ४ मे रोजी घडली होती. घटनेच्या दोन महिन्यांनंतर १९ जुलै रोजी त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि २० जुलै रोजी पहिली अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.