कंपनीमधील पार्टची चोरी; दोन कामगारांना अटक

bpcauthor bpcauthor
1 Min Read

महाळुंगे,दि १२ (पीसीबी)-कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कंपनीतून पार्ट चोरून नेले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करत दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार एप्रिल ते जुलै या कालावधीत बॉश लिमिटेड (वेअर हाउस) महाळुंगे येथे घडला.

संतोष भागुजी गारगोटे (वय 31, रा. खालुम्ब्रे, ता. खेड), राजू सुरेश बैकर (वय 35) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांचा एक साथीदार संदीप सोपान साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुणाल अजित बारटक्के यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बॉश लिमिटेड या कंपनीत काम करतात. त्यांनी कंपनीमधून 31 लाख 73 हजार 663 रुपये किमतीचे इंजेक्टर पार्ट चोरून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फिर्यादी यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले. आपल्या विरोधात गुन्हा दाखल होईल, या भीतीने आरोपींनी 31 लाख 57 हजार 844 रुपये किमतीचे पार्ट परत आणून दिले. मात्र 15 हजार 789 रुपयांचे दोन पार्ट कमी असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत

Share This Article