पूर्ववैमनस्यातून एकास कोयत्याने मारहाण

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पिंपरी,दि १२ (पीसीबी)- पिंपरी येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका व्यवसायिकाला हाताने व कोयत्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.11) पिंपरीतील तपोवन मंदिर रोड, पिंपरी येथे घडली आहे.

प्रमोद घनश्याम कांबळे (वय 49 रा. चिखली) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डिगंबर विठ्ठल कुदळे (वय 28), निलेश बाळू कुदळे (वय 42), नरेश गजानन पवार (वय 50, सर्व रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्राला घरी सोडण्यासाठी जात असताना आरोपींनी फिर्यादीला अडवले. जुन्या भांडण्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article