आम्ही इथले भाई आहोत, म्हणत पसरवली दहशत; एकास अटक

PCB Admin
1 Min Read

काळेवाडी, दि. ५ जुलै (पीसीबी) – आम्ही इथले भाई आहोत. जे आमच्या वाट्याला जातील त्यांना ठार मारू, अशी धमकी देत हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काळेवाडी पोलीस चौकीजवळ सोमवारी (दि. 3) रात्री घडली.

सलमान शेख (वय 24, रा. काळेवाडी) आणि नरसिंग जाधव (वय 22, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सलमान याला पोलिसांनी अटक केली आहे. शोएब सईद कुरेशी (वय 23, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या भांउणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी शोएब यांच्यावर काळेवाडी पोलीस चौकीजवळ सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कोयत्याने वार केला. मात्र शोएब यांनी हा वार चुकविल्यावर तो वार दुचाकीच्या टाकीवर पडला. त्यानंतर आरोपीने हातातील कोयता हवेत फिरवत “हम यहॉ के भाई है. हमे जो भी क्रॉस करेगा, उसे जिंदा नही छोडेंगे’ असे म्हणत आरडा-ओरडा करीत दहशत निर्माण केली. तसेच फिर्यादी यांच्या दुचाकीचे नुकसान केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article