निगडीत प्रवासी महिलेची सोन्याची बांगडी पळवली

1 Min Read

निगडी, दि. २९ (पीसीबी) – पीएमपी बस मधून प्रवास करत असलेल्या महिलेची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 24 मे रोजी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास मधुकर पवळे बीआरटी बस स्टॉप येथे घडली.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 24 मे रोजी दुपारी पीएमपी बसमधून प्रवास करीत होत्या. त्या मधुकर पवळे ब्रिज खाली बीआरटी बस स्टॉप येथे बसमधून उतरत असताना त्यांच्या हातातील 56 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने कापून चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article