मरकळ येथील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

PCB Admin
1 Min Read

मरकळ, दि. १० (पीसीबी) – खेड तालुक्यातील मरकळ येथे ओढ्याच्या किनारी सुरु असलेल्या दारूभट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आली.

पोलीस शिपाई विकास पालवे यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने मरकळ गावात ओढ्याच्या बाजूला गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. तिने तीन हजार लिटर दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यात दीड लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला झाडाझुडूपातून पळून गेली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article