आकुर्डीत निघाली भव्य दिव्य वीर सावरकरांची गौरव यात्रा, ठिकठिकाणी नागरिकांनी केले पुष्प वृष्टी द्वारे स्वागत

0
314

आकुर्डी, दि. १० (पीसीबी) -भारत मातेसाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात भाजपच्या वतीने व शिवसेनेला सोबत घेऊन मोठ्या उत्साहात निघत आहे. आकुर्डीच्या खंडोबामाळ ते आकुर्डी गावठाण अशी गौरव यात्रा रविवार सायंकाळी पाच वाजता आकुर्डी खंडोबा मंदिरापासून आकुर्डी गाव मार्गे दत्तवाडी विठ्ठल मंदिरा पर्यंत काढण्यात आली,
भारत मातेचे पूजन करून यात्रेची सुरुवात शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे श्री सदाशिव खाडे ,श्री अमर साबळे,एकनाथ पवार, अमित गोरखे, राजेश पिल्ले,मिलिंदजी देशपांडे, हेमंत हरहरे,नितीन वाटकर यांनी केली.

या यात्रेसाठी वीर सावरकरांचा भव्य व अत्यंत देखणा रथ बनवण्यात आला होता वीर सावरकरांची गाणी वाजवत असलेला बँड यामुळे या रॅलीमध्ये वातावरण अत्यंत देश प्रेमी झाले होते ढोल ताशा पथक त्याचबरोबर महिला ंनी बांधलेले भगवे फेटे व पुरुषांनी घातलेल्या भगव्या फेट्या व उपर्णे यामुळे अत्यंत शिस्तबद्ध अशी भव्य दिव्य मिरवणूक आकुर्डी गावातून पहिल्यांदाच निघाले टाळ मृदुंग असलेले वारकरी पथक अत्यंत जल्लोषात या यात्रेत सामील झाले होते व्यापारी मंडळींनी सावरकरांच्या रथावर ठिकठिकाणी थांबून पुष्पवृष्टी केली ,तीन किलोमीटरच्या या यात्रेमध्ये एक हजार पेक्षा जास्त नागरिक कार्यकर्ते व सावरकर प्रेमी उत्साहात सहभागी झाले होते, श्री भरत आमदापुरे यांचे वीर सावरकर या विषयावरील व्याख्यानाने या यात्रेची सांगता करण्यात आली, त्याप्रसंगी बोलताना भरत आमदापुरे म्हणाले…

“सावरकराना विरोध करणारे राजकीय स्वार्थाने बरबटलेले, सावरकर हे हिंदुत्व वादी होते पण ते असे म्हणतात की देशात सर्व समाजाला समान अधिकार हवेत.सर्व धर्म समभाव माननारे सावरकर च होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर यांचे समाज एकिकरणाचे विचार एकच होते,समाज हित आणि देशासाठी त्यांचे विचार होते,ते कुठेही एकतर्फी भूमिकेतून वागले नाही,सावरकरांचे विचार कुणीही वाचत नाही,ऐकीव चुकीच्या माहितीवर सावरकरांना बदनाम करण्याचे कट कारस्थान विरोधक करीत आहेत,ते जेवढा विरोध त्यांना करतील तेवढे सावरकर लोक जास्त वाचतील. कोणतेही महापुरुष हे देशासाठी प्रचंड झिजले आहेत, गांधी,फुले , आंबेडकर,शाहू महाराज यांनी प्रतेकानी एक विषय घेऊन एक भूमिका ठरविली व त्यावर समाजासाठी काम केले,त्यामुळे हे सर्वच महापुरुष आपल्या साठी वंदनीय आहे, सावरकरांचे विचार हिंदुत्ववादी होते,जहाल होते परंतु एकच धेय त्यांनी ठेवले ते म्हणजे देश आणि धर्म टिकला पाहिजे, समाज क्रांतीचा विचार त्यांनी मांडला म्हणून सावरकर आमच्या साठी विर सावरकर ठरतात”.

यात्रा यशस्वी होण्यासाठी आमदार उमाताई खापरे ,अमित गोरखे,श्री सदाशिव खाडे, श्री अनुप मोरे ,श्री केशव घोळवे, श्री संदीप वाघेरे ,श्री माऊली थोरात , सौ सुजाता पलांडे, श्री कैलास कुटे, श्री प्रमोद कुटे, उर्मिला काळभोर,सुप्रिया चांदगुडे, अमोल थोरात, माऊली थोरात, संजय मंगुडेकर गणेश लंगोटे ,समीर जावळकर ,अतुल इनामदार महेंद्र बाविस्कर,सोनाली हिंगे,अनुराधा गोरखे,संदीप वाघेरे ,आर एस कुमार, जयेश चौधरी, मदन गोयल महेश कुलकर्णी,तेजस्विनी कदम, प्रकाश जवळकर देवदत्त लांडे ,गणेश ढाकणे विशाल वाळूजकर, कोमल शिंदे, कोमल काळभोर, प्रदीप बेंद्रे, नंदू भोगले, विजय शिनकर, नगरसेवक शीतल शिंदे, सुरेश गदिया, रघुनाथ जवळकर,गोपाल केसवांनी,
सावरकर गौरव यात्रा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी सर्वांचे स्वागत केले,भाजपा सरचिटणीस राजू दुर्गे यांनी आभार मानले.