राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच प्रवीण गोपाळे यांचा खून

bpcauthor
1 Min Read

पुणे, दि.२ (पीसीबी) पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाची निर्घणपणे हत्या करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील शिरगाव येथे ही घटना घडली आहे. प्रवीण गोपाळे असे हत्या झालेल्या सरपंचाचे नाव आहे. शनिवारी रात्री सरपंच गोपाळे हे गावात असताना अचानक अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गोपाळे यांचा मृत्यू झाला आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या हत्यानंतर गावात तणाव असून, पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे गाव प्रति शिर्डी म्हणून ओळखले जाते. गोपाळे हे शनिवारी रात्री आपल्या दुचाकीवरून साई मंदिरासमोरून जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींना त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी गोपाळे हे पळत होते. आरोपींना पाठलाग करून त्यांच्यावर आणखी वार केले. त्यात ते गंभीर जखमी होऊन गोपाळे यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर हल्लेखोर हे पसार झाले आहेत.

या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. साई मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजची तपासणी पोलीस करत आहेत. गावात पडत असलेल्या प्लॉटिंगच्या कारणातून ही हत्या झाली असल्याचे बोलले जात आहे

Share This Article