पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रविण शिर्के तर कार्याध्यक्षपदी अविनाश आदक

0
260

-पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया अध्यक्षपदी प्रशांत साळुंखे तर कार्याध्यक्षपदी राजू वारभुवन

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) :- मराठी पत्रकार संघ मुंबई सलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व पिंपरी चिंचवड डिजिटल मिडियाची द्विवार्षिक निवडणूक मार्च 2023 ते मार्च 2025 प्रक्रिया शनिवार दि.25/ 3 /2023 रोजी भा. वी. कांबळे पत्रकार कक्ष तिसरा मजला महापालिका भवन पिंपरी18 येथे पूर्ण झाली.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्षपदी- प्रविण शिर्के, कार्याध्यक्षपदी- अविनाश आदक, उपाध्यक्षपदी- माधुरी कोराड, गणेश मोरे, अविनाश पर्बत, सरचिटणीस- रोहित खगेँ, सहचिटणीस- सोमनाथ नाडे, खजिनदार- राम बनसोडे, समनवयक-राकेश पगारे, प्रवक्ता- झुबेर खान, कार्यकारीणी सदस्यपदी- तुळशीदास शिंदे, संतोष जाधव, सिताराम मोरे, प्रकाश जमाले, विशाल जाधव पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीपदी-अनिल भालेराव तर जिल्हा प्रतिनिधी-अनिल वडघुले यांची निवड झाली.

पिंपरी चिंचवड डिजिटल मिडिया अध्यक्षपदी- प्रशांत साळुंखे, कार्याध्यक्ष- राजू वारभुवन, उपाध्यक्ष-देवा भालके, विकास चौधरी, मुझफ्फर इनामदार, सरचिटणीस-महाविर जाधव, खजिनदार-विनायक गायकवाड प्रवक्ता-अविनाश कांबिकर यांची निवड झाली.

पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षपदी- अर्चना मेंगडे, उपाध्यक्ष-सिता जगताप यांची निवड झाली.

तसेच पत्रकार भवन समन्वयकपदी-गोपाळ मोटघरे, पत्रकार कॉलनी समन्वयकपदी-उत्तम कुटे,सहसमन्वयक-दिनेश दुधाळे, पत्रकार महाविद्यालय समन्वयकपदी-विजय जगताप, सहसमन्वयक-प्रमोद गरड, पत्रकार प्रशिक्षण वर्ग समन्वयकपदी-गौरव साळुंखे, सहसमन्वयक- अजय कुलकर्णी, पत्रकार डिजिटल स्टुडिओ समन्वयकपदी-सुरज कसबे यांची निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी-बाळासाहेब ढसाळ होते. यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती पश्चिम महाराष्ट्र निमंत्रक-गोविंदजी वाकडे, विभागीय सचिव- नाना कांबळे हे उपस्थित होते.