छत्रपती संभाजीनगर, दि. १७ (पीसीबी) – छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईडी’ची छापेमारी सुरु आहे. त्यातून एक नवीन प्रकरणं उघडकीस आले आहे. महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला आहे. एकाच लॅपटॉपवरून टेंडर भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी ईडीकडून 9 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
आज सकाळीच ईडीकडून शहरातील 3 ठिकणी छापेमारी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यानंतर ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिसात 40 हजार घरांच्या जवळपास 4 हजार कोटींच्या या प्रकल्पात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निविदा घोटाळ्यात अडकलेल्या समरथ कन्स्ट्रक्शन, इंडो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस आणि जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंत्राटदार कंपन्यांनी संयुक्त भागीदारीमध्ये पुणे परिसरात बांधलेल्या बहुमजली इमारतींची पाहणी करण्यासाठी महापालिकेने समिती स्थापन केली आहे. ही समिती या कंत्राटदारांनी बांधलेल्या इमारतींची पाहणी करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्राॅपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी टेंडर भरले होते. 4 हजार कोटींच्या प्रकल्पात 40 हजार घरकुलाचा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, समरथ कन्स्ट्रक्शनने बँक गॅरंटी भरण्यास असमर्थ असल्याचे सांगितली होती. यानंतर अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर समरथ कंपनीने पडेगाव येथील घरकुल प्रकल्पासाठी बँक गॅरंटी भरली आहे. यात चारपैकी एक कंपनी अपात्र ठरली होती.