ग्राहकाने हातचलाखीने पळवले चार लाखांचे दागिने

PCB Admin
1 Min Read

देहूरोड, दि. १९ (पीसीबी) – ज्वेलर्स दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या एका व्यक्तीने दुकानदाराची नजर चौकावून हातचलाखीने चार लाखांचे दागिने पळवले. हा प्रकार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी देहूरोड मेन बाजारात कांचन ज्वेलर्स या दुकानात घडला.

प्रदीपकुमार कांतीलाल पारेख (वय ५४, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १८) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पारेख यांचे कांचन ज्वेलर्स हे दुकान देहूरोड मेन बाजारात आहे. ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती पारेख यांच्या दुकानात आला. त्याने साडेसात तोळे वजनाचे चार लाख रुपये किमतीचे कानातील दागिने दाखवण्यास सांगितले. पारेख यांनी दागिने दाखवले असता त्या व्यक्तीने पारेख यांची नजर चौकावून हातचलाखीने ते दक्षिणे घेऊन जात फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article